पुणे. कोराेनाची महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या झाली अाहे. संबंधित काेराेना रुग्णांची संख्या ठरावीक भागातून कशाप्रकारे वाढू लागली अाहे याची शास्त्रीय पद्धतीने अद्ययावत माहिती पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून तयार करण्यात अालेल्या एकात्मिक डिजिटल डॅशबाेर्डद्वारे मिळू लागली अाहे. जीपीएस अाणि जीअायएस तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील काेणत्या भागात काेराेनाचा संसर्ग जलदगतीने पसरताे हे समजत असल्याने संबंधित भाग सील करण्याची कारवाई सुरू करण्यात अाली अाहे. राज्यातील काेराेनाचा पहिला रुग्ण पुण्यात मिळाल्यापासून त्याची अंमलबजावणी सर्वप्रथम करत, साेमवारी रात्रीपासून २१ किलाेमीटरचा भाग बंद केला गेला.
पुणे शहरातील १८ पेठांसह अारटीअाे ते मार्केटयार्ड अाणि दत्तवाडी ते कॅम्प या दरम्यानचे परिसरात काेराेनाची लागण झालेले ४० रुग्ण सापडल्याचे डॅशबाेर्डद्वारे समाेर आले. रुग्णाच्या १ किलाेमीटरच्या परिघात दैनंदिन वावर असल्याने त्या भागात राेगाचा पसार हाेण्याचा धाेका असल्याने तेथील मॅपिंग करत वाहतूक बंद करून नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा अाणल्या गेल्या. या भागातील स्वच्छतेवर अधिक भर देऊन घराेघर निर्जंतुकीकरण केले जाणार अाहे. त्यानुसार सात दिवसांचे जीवनावश्यक साहित्य नागरिकांनी घरी घेऊन ठेवावे, असे सांगण्यात अाले अाहे.
प्रतिबंधात्मक उपाययाेजनेचा उपयाेग
डिजिटल डॅशबाेर्डमुळे काेराेना बाधितांची जास्त संख्या असलेला भाग अाेळखणे शक्य झाले व त्यावर लक्ष्य केंद्रित करून प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्यासाठी उपयाेग झाला अाहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर अाणि पुणे जिल्ह्यातील काेराेना रुग्णांचे परिसराची एकत्रित माहिती डॅशबाेर्डवर समजून येत अाहे. डॅशबाेर्डद्वारे संशयित रुग्णांची अाराेग्य विषयक माहिती, हाेम क्वाॅरंटाइन नागरिक व त्यांचे संपर्कातील लाेक अाणि शासकीय विलगीकरण केंद्राची अद्ययावत माहिती डॅशबाेर्डवर अाल्याने प्रत्येक रुग्णाचे जीपीएस मॅपिंग करणे शक्य झाले अाहे.